Ritu Raj Singh Passed Away:
टीव्ही इंडस्ट्रीतून दु:खद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध टीव्ही अभिनेता ऋतुराज सिंहचे (Rituraj Singh) निधन झाले आहे. ६० व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला. अनेक प्रसिद्ध टीव्ही मालिकांच्या माध्यमातून ऋतुराजने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आणि त्यांचे मन जिंकले आहे. ऋतुराजच्या निधनामुळे चाहते, टीव्ही इंडस्ट्रीसोबत बॉलिवूडला देखील मोठा धक्का बसला आहे.
ऋतुराज सिंहने 'ज्योती', 'हिटलर दीदी', 'शपथ', 'वॉरियर हाय', 'आहट और अदालत', 'दीया और बाती हम' यासारख्या प्रसिद्ध टीव्ही मालिकांमध्ये काम केले होते. ऋतुराजने या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनामध्ये वेगळं स्थान निर्माण केलं होतं. ऋतुराजच्या निधनामुळे सर्वांना मोठा धक्का बसला असून सोशल मीडियावर पोस्ट करत चाहते आणि सेलिब्रिटी दु:ख व्यक्त करत आहेत.







.jpeg)



